Posts

Showing posts from March, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय

Image
भारताला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेश च्या एका छोटाश्या गाव महू (लष्करी छावणी )मध्ये झाला. त्यांचा वडिलांच नाव रामोजी मालोजी सकपाल आणि आईच  नाव भीमाबाई असे होते. रामोजी सकपाल हे इंग्रजांचा मिलिटरी मध्ये सुभेदार होते. आपल्या आई वडिलांचे बाबासाहेब हे चौदावे पुत्र होते.  बाबासाहेबांचा जन्म महार जाती मध्ये झाला होता , त्याकाळी महार जातीला अस्पृश्य आणि खूप खालच्या वर्गा मध्ये गणला जात असे. बाबासाहेबांच्या लहानपणी त्यांचा आणि त्यांचा परिवारासोबत सामाजिक आणि आर्थिक भेदभाव झाला.  १८९४ साली रामोजी सकपाल ब्रिटिश इंडियन आर्मी मधून सेवा निवृत्त झाले , त्याचा २ वर्षानंतरच बाबासाहेबांच्या आई चा निधन झाले. त्यापश्चात बाबासाहेब आणि त्यांचा भावंडांचा सांभाळ त्यांच्या आत्याने  अत्यंत हालाकीच्या परिस्तितीमधे केला. ह्या कठीण परिस्तितीमध्ये बाबासाहेबांचे केवळ २ भाऊ बलराम, आनंदराव आणि २ बहिणी मंजुळा आणि तुळसा जगू शकले. सर्व भावंडांमध्ये केवळ बाबासाहेबच शाळा यशश्वीपणे पूर्ण करून उच्च शिक्षण घेऊ शकले....