डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय


  1. भारताला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेश च्या एका छोटाश्या गाव महू (लष्करी छावणी )मध्ये झाला. त्यांचा वडिलांच नाव रामोजी मालोजी सकपाल आणि आईच  नाव भीमाबाई असे होते. रामोजी सकपाल हे इंग्रजांचा मिलिटरी मध्ये सुभेदार होते. आपल्या आई वडिलांचे बाबासाहेब हे चौदावे पुत्र होते. 
  2. बाबासाहेबांचा जन्म महार जाती मध्ये झाला होता , त्याकाळी महार जातीला अस्पृश्य आणि खूप खालच्या वर्गा मध्ये गणला जात असे. बाबासाहेबांच्या लहानपणी त्यांचा आणि त्यांचा परिवारासोबत सामाजिक आणि आर्थिक भेदभाव झाला. 
  3. १८९४ साली रामोजी सकपाल ब्रिटिश इंडियन आर्मी मधून सेवा निवृत्त झाले , त्याचा २ वर्षानंतरच बाबासाहेबांच्या आई चा निधन झाले. त्यापश्चात बाबासाहेब आणि त्यांचा भावंडांचा सांभाळ त्यांच्या आत्याने  अत्यंत हालाकीच्या परिस्तितीमधे केला. ह्या कठीण परिस्तितीमध्ये बाबासाहेबांचे केवळ २ भाऊ बलराम, आनंदराव आणि २ बहिणी मंजुळा आणि तुळसा जगू शकले. सर्व भावंडांमध्ये केवळ बाबासाहेबच शाळा यशश्वीपणे पूर्ण करून उच्च शिक्षण घेऊ शकले. 
  4. बाबासाहेबांच खर आडनाव आंबवडेकर होत  (आंबवडे हे बाबासाहेबांच गाव रत्नागिरीतील मंडणगड तालुका मध्ये आहे) , आंबेडकर हे आडनाव बाबासाहेबाना त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर ह्यांनी दिले होते. त्यांच बाबासाहेबांवर खूप प्रेम होते. 
  5. बाबासाहेबांचे आदर्श थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले , संत कबीर आणि गाडगे महाराज होते. 
  • शिक्षण 
  1. उच्च माध्यमिक : १८९७ साली बाबासाहेबांचा परिवार मुंबईला आले , जिथे एल्फिन्स्टन हाइस्कूल मध्ये बाबासाहेब हे पहिले अस्पृश्य समाजाचे विद्यार्थी होते. १९०७ साली बाबासाहेबानी मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर पुढे बाबासाहेबानी एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये प्रवेश केला , एल्फिन्स्टन कॉलेज हे त्यावेळी मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. असे करणारे बाबासाहेब हे अस्पृश्य समाजाचे पहिले व्यक्ती होते. 
  2. पदवी शिक्षण  : १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र पदवी प्राप्त. त्यापुढे बाबासाहेबानी बडोदा संस्थानात नोकरी केली. 
  3. कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यास : १९१३ साली बाबासाहेब वयाच्या २२ वर्षी पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यांना पुढील अभ्यासासाठी बडोदा संस्थानातर्फे तीन वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी १९१५ साली एम. ए. चा शिक्षण पूर्ण केला. एम. ए. ला मुख्यतः अर्थशास्त्र आणि इतर विषय समाजशास्त्र ,इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानवशास्त्र होते. ह्यासाठी बाबासाहेबानी "प्राचीन भारतातील वाणिज्य" (Ancient Indian Commerce) हा प्रबंध लिहला होता. 
  4. पी .एच. डी पूर्ण: १९१६ ला बाबासाहेबानी त्यांचा दुसरा प्रबंध लिहला (National Dividend of India-A Historic and Analytical Study) "भारत-एक ऐतिहासिक व पृथक्करण अभ्यास राष्ट्रीय लाभांश". ह्या प्रभंध साठी बाबासाहेबाना अजून एकदा एम. ए. पदवी बहाल करण्यात आली. १९२७ साली बाबासाहेबांनी अर्थशास्त्र विषया मध्ये पी. एच. डी  हि पदवी मिळाली. त्यांनी लिहलेल्या त्यांचा तिसरा प्रबंध "भारतातील  जाती: त्यांची घडण, उत्पत्ती आणि विकास" (Castes in India: Their Mechanism, Genesis and Development )साठी बहाल करण्यात आली. 

  1. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्युत्तर अभ्यास : १९२१ साली त्यांनी आपली मास्टर डिग्री लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधू पूर्ण केला. त्यांनी हि पदवी त्याचा प्रबंध "रुपयाच्या समस्या: त्याची मूळ आणि त्याचे समाधान" (The problem of the rupee: Its origin and its solution) साठी देण्यात आली. , १९२३ साली बाबासाहेबांनी D.Sc. हि पदवी अर्थशास्त्र ह्या विषयामध्ये प्राप्त केली. 
  2. मानद उपाधी : बाबासाहेबांना LL.D, हि मानद उपाधी कोलंबिया विद्यापीठ तर्फे १९५२ साली बहाल करण्यात आली. तसेच D.Litt. हि मानद उपाधी त्यांना उस्मानिया विद्यापीठ तर्फे १९५३ साली देण्यात आली. 
  • विवाह
  1. १९०६ साली वयाच्या १५ वर्षी बाबासाहेबांचा विवाह रामाबाईंशी (वय ९ वर्ष)  झाला. 

  1. १९३५ साली रमाबाई दीर्घ आजारानंतर मरण पावल्या. 
  2. १५ एप्रिल १९४८ साली बाबासाहेबांनी दुसरा विवाह डॉ . शारदा कबीर ह्यांच्याशी केला. पुढे जाऊन डॉ . शारदा कबीर ह्यांनी आपलं नाव सविता आंबेडकर असा बदलले. 
बाबासाहेबांचा आयुष्यातील काही महत्वाच्या तारीख :
  • जन्म: १४ एप्रिल १८९१ 
  • प्रथम विवाह : १९०६ साली  
  • बाबासाहेबांच्या वडिलांचा मृत्यू : ०२ फेब १९१३
  • चवदार  तळे महाड पाण्यासाठी सत्याग्रह : २० मार्च १९२७
  • मनुस्म्रीती दहन महाड : २५ डिसेंबर १९२७
  • काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक : ०२ मार्च १९३०
  • दुसरा विवाह : १५ एप्रिल १९४८ साली 
  • धर्मांतर : १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धर्म आपल्या लाखो अनुयायांसोबत स्वीकारला 
  • मृत्यू : ६ डिसेंबर १९५६
  • भारतरत्न : सण १९९० साली भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न मरणोत्तर बहाल केला
भूषवलेले महत्वाची पदे :
  • भारतीय  संविधानाच्या मसुदा समितीच अध्यक्षपद 
  • स्वतंत्र भारताचे प्रथम कायदे आणि न्याय मंत्री 
  • व्हाइसरॉय कार्यकारी परिषदेच कामगार सदस्यपद 
  • लोकसभा आणि राज्यसभेच सदस्यत्व
  • गोलमेज परिषदेचा सदस्य 
भारताला बाबासाहेबांकडून मिळालेली काही भेट /देणगी :
  • भारतीय संविधान 
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  ( बाबासाहेबांनी हिटलर यंग आयोगाकडे सादर केलेल्या कल्पनेवर आधारित )
  • भारतीय वित्त आयोगाची स्थापना (Finance Commission of India)
  • जमीन महसूल कर आणि अबकारी कर धोरणे (Land Revenue Tax and excise duty policies)
  • सर्व क्षेत्रात महिला समान अधिकार

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा / 22 vows by Babasaheb.