कविता - जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली
बुद्धविहारातली तुझी मूर्ती त्वेषाने हसली
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।।
काय अन कसे बघावे
तुझ्या लेकरांचे राजकारणी कावे
सचिव, अध्यक्ष , उपाध्यक्ष पदासाठी दावे
तुझ्या विचारांची प्रतिमा एकातही नाही दिसली ।।
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।।
बघितलेस तू त्यांचे हेवेदेवे ,त्यांची उर्मटपणाची भाषा
जणु जयंती नाहीच तुझी , आहे कुठला तमाशा
बाबा तुमची विचार गंगा फसली ।।
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।।
कोणी म्हणतय लावा ऑर्केस्ट्रा
कोणी म्हणतय लावा डिजे , बाजा
भिंगरी बहाद्दर होऊन डिस्को करून
करू म्हणे मोठा गाजा वाजा
बाबा तुम्ही ओढलेली मर्यादा यांनी पुसली ।।
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।।
जयंती म्हणजे लागत फक्त डिजेपुढे नाचायला
कोणीच तयार होईना तुमचे विचार वाचायला
नाच नसला तर म्हणे मजा येणार कसली ।।
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।।
तुमचा संघर्ष इतिहास वाचावा ,पुढचा पिढींना कळावा
भिमसैनिक हा शांतप्रिय होऊन बुध्द धम्माकडे वळावा
असा कार्यक्रम घ्या म्हटल तर यांना नागीण डसली ।।
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।।
तुच बसवलय यांना माणसात
याची त्यांना जाण कोण देईल
असे असले रथ पुढे कोण नेईल
सांगुन सांगुन त्यांना जिभ घासली ।।
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।।
सौजन्य :- व्हॅट्सअँप फॉर्वर्डेड मेसेज
Comments
Post a Comment